Sunday, April 21, 2013

Making of an Image : Bridge to my Shire!And it leads to my shire!

Thursday, January 24, 2013

Making of an Image : Hochberg (near Walchensee) #1One of the fantastic places to hike. It was a weekend outing if nothing had been planned. I saw the sun rays piercing the thick fog and decided to take the camera out. All the lines, diagonals were complimented by the group of hikers passing by.

EOS500D+35-70/3.4T*

In full glory : Click here!

Wednesday, August 17, 2011

संवाद - अतुल कुलकर्णी


- तेजू खापणे

संवाद - अतुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत खापणे


’मला हे करायचे नाही आहे. मी हे करणार नाही.’ असं करणारी माणसं मला भावतात. वरवर पाहता ती बऱ्याच जणांना ’येडी’ किंवा मूर्ख वाटू शकतात. पण असेच लोक नवीन वाटा निर्माण करतात. पुण्याच्या कॉलेजात प्रवेश मिळूनसुद्धा मला इंजिनीयरिंग नाही शिकायचे आहे, मला ते नाही आवडत असं म्हणून ते खरोखर सोडून देणारे आणि आपल्याला काय आवडते हे शोधून त्या क्षेत्रात काहीतरी करू म्हणून त्याचे प्रशिक्षण घेऊन, नंतर गांधी विरुद्ध गांधी, ख़राशें, चांदणी बार, दहावी फ, देवराई, सत्ता, रंग दे बसंती, वळू अशा एकापेक्षा एक कलाकृती सादर करणारे ’नटरंग’ अतुल कुलकर्णी यांच्याशी ह्या वर्षी गप्पा मारायला मिळाल्या. पालवी दिवाळी अंकासाठीच्या ’संवादा’साठी दिलेल्या वेळेबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

नमस्कार. ’नटरंग’ च्या भरघोस यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. अतुल, तुम्ही बेळगाव - सोलापूर - पुणे - दिल्ली ह्या प्रवासाबद्दल काही सांगू शकाल का?

मी ११-१२ वी बेळगावला केली, नंतर पुण्याला engineering ला admission घेतली. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की ते नाही जमणार आहे मला, तर मग ते सोडून सोलापूरला गेलो. तिथे B.A. ला ऍडमिशन घेतली. तिथे असताना ’नाट्य आराधना’ नावाच्या ग्रुपमध्ये काम सुरु केले. आणि माझ्या लक्षात आले की मला ह्याचीच आवड आहे आणि हेच करायचे आहे. मग दिल्लीला National School of Drama मध्ये admission घेतली professional actor होण्यासाठी. तिथे ३ वर्षे होतो आणि मग मुंबईत आलो as a professional actor.

मग शाळेत असताना तुम्ही ’फ’ तुकडीचे विद्यार्थी होता की ’अ’? आणि तुम्हाला ’देशमुख’ सरांसारखे कुणी शिक्षक भेटले का?

मी ’अ’, ’ब’ तुकडीतच होतो. आमच्या शाळेमध्ये जे वरचे क्लास होते त्या उतरांडीमध्येच होतो. असे शिक्षक अर्थातच असतात पण मी ’फ’मध्ये नसल्याने मला स्वतःला तसा अनुभव नाही.

आपल्याकडे अशी म्हण आहे की ’यशाचे धनी खूप असतात पण अपयशाचे वाली आपण स्वतःच असतो.’ तुम्ही engineering सोडायचे आहे किंवा नंतर NSD ला admission घ्यायची आहे हे निर्णय घेताना भीती वाटली होती का? घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?

भीती म्हणण्यापेक्षा insecurity म्हणू, पण ती अर्थातच होती. कारण माहिती नव्हतं काय होणार पुढे. आणि तेव्हा असंही ठोसपणे ठरलं नव्हतं की acting मध्ये जायचे आहे वगैरे. त्यामुळं insecurity नक्कीच होती. घरच्यांना अर्थातच काळजी होती की आता याचे काय होणार. कारण profession वगैरे काहीच दिसत नव्हतं. आणि आपल्याकडे B.A.ला फारशी किंमत नसते दुर्दैवाने.

तुमचं गांधी विरुद्ध गांधी हे पहिलं professional नाटक. त्यानंतर ख़राशें. त्याचा अनुभव कसा होता? त्यातली एखादी आवडती कविता आहे का तुमची?

हो. बरंच नवीन शिकायला मिळालं. ख़राशें हे गुलजार साहेबांच्या कथा आणि कवितांचा एक कोलाज आहे जे आम्ही गेले ६/७ वर्षे करतो आहे. त्यात मी खौफ़ नावाची एक गोष्ट सांगतो आणि काही कविता सादर करतो. ६/७ जण आहोत आणि मिळून त्या चार कथा आणि कविता सादर करतो. गुलजारसाहेबांनी आत्तापर्यंत जे काही communal riots आणि फाळणीच्या वेळी झालेल्या अत्याचाराबद्दल, जाती/धर्मावरुन जे काही दंगे झाले आहेत भारतात त्यावर त्यांचं भाष्य आहे. त्या background वर आधारित आहे ते. दुर्दैव इतकेच आहे की आम्ही ६/७ वर्षे ते सादर करतो आहोत पण परिस्थितीत काही बदल नाही. त्यामुळं तो कार्यक्रम जेव्हा irrelevant होइल तो खरा आनंदाचा क्षण असेल आम्हा सर्वांसाठी.

अनेक कविता आवडतात त्यातल्या. खरंतर सगळ्याच. पण मला वाटतं तो एक त्या कथा आणि कविता असा मिळून पूर्ण अनुभव आहे. तो जास्त आवडतो.

तुम्ही आत्तापर्यंत अगदी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. शेष (देवराई) किंवा गुणा (नटरंग) सारख्या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनाही हेलावून सोडतात. पण एक कलाकार म्हणून इतके दिवस ती व्यक्तिरेखा जगल्यानंतर emotional attachment होते का आणि ती काही ख़राशें सोडून जाते का?

मी खरंतर त्या पद्धतीचा नट नाही आहे. मला असं नाही वाटत की भूमिका तुमच्यावर परिणाम करतात किंवा त्यांनी करायला हवा. तुमच्यात काही बदल होणं ती व्यक्तिरेखा सतत सादर केल्यामुळं शक्य आहे, स्वाभाविक आहे पण तो वैचारिक मुद्दा आहे, intellectual मुद्दा आहे. तो emotional मुद्दा नाही वाटत मला. उलट मी अशा पद्धतीच्या acting च्या विरोधात आहे. एखाद्या भूमिकेने तुमच्यावर परिणाम केला नाही पाहिजे असं माझं मत आहे कारण शेवटी अभिनय एक तंत्र आहे. त्याच्यात तंत्राचा खूप वापर असतो. अगदी १००% नसला तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळं असं हरवून जाणं मला स्वतःला मान्य नाही किंवा ती माझी अभिनयाची पद्धत नाही असं म्हणू हवं तर. पण अर्थातच तुम्ही एखादी भूमिका सादर करता तेव्हा तिचा अभ्यास करता. उदाहरणार्थ मी गांधींची भूमिका करतो तेव्हा तिचा अभ्यास करतो आणि त्या विचारसरणीचा माझ्यावर, माझ्या विचारप्रणालीवर परिणाम होणं शक्य आहे. पण हे तुम्हाला प्रत्येकवेळी ठोसपणे सांगता येईल असं नाही. पण हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही नटच असायला हवं असं नाही. मी एक साधा वाचक म्हणून जरी काही वाचलं तरी त्याचा माझ्यावर परिणाम होतच असतो. त्यामुळं एक general व्यक्ती म्हणून परिणाम होणं सहज शक्य आहे. एक अर्थातच असतं की आमची intensity जास्त असते. मला एक नट म्हणून ती स्वतः सादर करायची असते. त्यामुळं त्या intensity चा तसा जास्त फायदा मला होतो, एक नट म्हणून. मी त्यातून स्वतःच गेल्यामुळं. पण असं होणं शक्य असतं. बऱ्याचदा अनुभवांचा, माहितीचा आपल्यावर परिणाम होत असतो. ते सहज शक्य आहे. ते आमच्याही बाबतीत होतंच.

प्रेक्षकांचं असं असतं की जे काम आम्ही सहा/आठ महिने केलेलं असतं ते २/३ तासात त्यांच्यासमोर सादर होतं. त्या एका capsule मध्ये ते बघितलं जातं. आणि दुसरं म्हणजे तिथंही सूक्ष्मपणे बघितलं तर emotional परिणाम हा थोडावेळच असतो बाकीचा जो असतो तो intellectual पातळीवरचा असतो. पण त्यातून जी माहिती, ज्ञान मिळतं ते दूरगामी असतं. अर्थात तुम्ही जे पाहता ते आमच्या आयुष्यात ६/७ महिन्याच्या period मध्ये spread झालेलं असतं. अर्थातच त्याचा एक strain असतो, नाही असं नाही. पण काही गंभीर परिणाम होतात किंवा व्हावे असं मला नाही वाटत. निदान माझी तरी अभिनयाची तशी पद्धत नाही.

आणि त्या सादर करताना तुम्ही पूर्वतयारी कशी करता?

मला असं नेहमीच वाटत आलंय की जी script असते ती तुम्हाला सांगते की काय पद्धतीची तयारी हवी. सगळ्याच सिनेमांना एकसारखी तयारी लागते असं नाही आहे किंवा एकच पद्धत आहे असेही नाही आहे. मग तुम्ही एकदा script हातात घेतली आणि पुन्हा पुन्हा वाचली की लक्षात येतं की कशी आणि कुठून तयारी करायला हवी. आपोआप कळतं. आणि अर्थातच दिग्दर्शक असतोच तुमच्याबरोबर, तो तुम्हाला guide करतोच.

एखादी व्यक्तिरेखा आहे का ज्याच्याशी तुम्ही स्वतःला relate करु शकलात?

प्रत्येक character तसं असतं. कारण प्रमाण वेगवेगळं असलं तरी काही traces असतात. आपण अनेक स्वभावांचे मिळून एक बनलेलो असतो. त्यामुळं प्रत्येक character मध्ये थोडे फार आपण दिसतोच. त्याचं प्रमाणं अर्थातच वरखाली होतं. मला बघतानाही आणि सादर करतानाही असं नेहमीच वाटतं कारण आपणही माणूस आहोत आणि ते character ही. त्यामुळं ते relation होतच कुठे ना कुठे.

नटरंग साठी घेतलेली बाह्यतयारी तर आता सर्वमुखी आहे. पण इतर तयारी कशी केलीत?

मी मघाशी म्हटल्याप्रमाणे script हे एक मोठं हत्यार असतं. त्याचा वापर, उपयोग अर्थातच झाला. आणि नटरंगच्या बाबतीत आणखी एक होतं ते म्हणजे ही कथा एका कादंबरीवर आधारित आहे तर त्याचं वाचण अर्थातच झालं. समजून घेण्यासाठी. तर मुख्य ह्याच दोन गोष्टी होत्या. आनंद यादवांशी खूप चर्चा झाली ज्यानी ही कादंबरी लिहिली आहे. रवि अर्थातच बरोबर होता. गुरु ठाकूर जो लेखक आहे त्याच्याशीही. काही जुने तमाशाप्रधान सिनेमे पाहिले. हेच तयारीचे मुख्य स्रोत होते. Choreographer फुलवा खामकरची ही खूप मदत झाली. आमच्या बरोबर एक assistant होता जो सतत बरोबर असायचा शूटिंगच्या वेळेला. तो कोल्हापूरचाच होता. त्याला मी dialogues बोलायला लावायचो. ते कानात साठवून मग shot द्यायचो. त्याची खूप मदत झाली.

नटरंग स्विकारताना गुरु ठाकुरांच्या शब्दात सांगायचं झालं तर 'आज दिली बघं नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे' असं वाटलं होतं का?

भीती अशी नव्हती वाटली. पण in a sense ते कसं सादर करणार हे माहिती नव्हतं. त्या अर्थाने एक anxiety, भीती होती. मला तेच रोल आवडतात जे मला घाबरवतात त्या अर्थाने. कारण माहिती नसतं हे आपण कसं करणार हे. पण तशी शंका होती असं मला नाही वाटतं. पण प्रचंड मेहनत लागणार आहे हे माहिती होतं. ते challange नक्कीच होतं.मला अजून आठवतं आहे, college मध्ये असतानाची गोष्ट आहे. माझा मित्र आणि मी पहिल्या दिवशीचा दोघी चित्रपट पाहायला गेलो होतो. आम्हाला पैसे परत देऊन उत्तर मिळाले, परवडत नाही दोघांसाठी कशाला लावू? आणि गेल्या काही वर्षात वेगळं चित्र दिसतं आहे. सैफ़ 'लंगडा त्यागी' करु शकतो, अमिताभ बच्चन 'पा' किंवा 'मनू (अक्स)' सारखे character सादर करु शकतात आणि ते चित्रपट चालतात. तर तुम्हाला वाटतं का की viewer has gotten mature now and these are exciting times for film industry, marathi in particular?


Definitely. These are exciting times. आणि मराठी किंवा इतर भाषेतल्या चित्रपटांसाठी तर विशेष करुन. कारण कसं असतं की audience also goes through social, economical, political and education changes. त्यावर सांस्कृतिक समज किंवा बदल अवलंबून असतो. अलिकडे जे काही भारतात बदल झाले आहेत त्यामुळे आणि exposure मुळे म्हणा, त्यांना वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळतात. त्यामुळं बदल नक्कीच झालेले आहेत. ज्या पद्धतीचा सिनेमा पूर्वी होता तसा आता बनत नाही. अर्थात ती सगळ्यात उत्तम phase होती का हे भूतकाळात बघावं लागतं. चालू असताना आपल्याला कळत नाही की हे कसं पुढे जाणार आहे वगैरे वगैरे. इथून जिथेही जाऊ ते एका चांगल्या पातळीवर जाऊ याची खात्री मला नक्कीच वाटते.

अतुल, तुमच्या चित्रपटांचं एक वैशिष्ठ्य असं असतं की strong storyline, character. पण एखादा असा कलाकार आहे की ज्याला तुम्ही irrespective of the story, character पाहू शकता?

कितीतरी लोक, कलाकार आहेत. अमिताभ बच्चन उदाहरणार्थ. त्यांनी कितीतरी वाईट roles अगदी convincingly केल्या आहेत. त्याला एक वेगळं skill लागतं. I have always respected him for that. त्यांनी अत्यंत stupid गोष्टी अगदी convincingly लोकांसमोर मांडल्या आहेत. आणि हे फार मोठं skill आहे.

तुमची पहिली एकांकिका ही विनोदी एकांकिका होती, त्यानंतर अलीकडे वळूमध्ये तुम्ही एक हलका/फुलका role केलात. तर तुमचे आवडते विनोदी चित्रपट कुठले आहेत आणि पुन्हा एखादा विनोदी role करायला आवडेल का?

खूप आवडतात. गोलमाल खूप आवडतो. हृषिकेश मुखर्जी/गुलजार साहेबांचा. खूप वेळा पाहिला आहे आणि पाहू शकतो परत परत. अंगूर आहे गुलजार साहेबांचा. तो ही आवडतो. नक्की आवडेल अशा एखाद्या हलक्या/फुलक्या पिक्चरमध्ये काम करायला.

आणि कुठले दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर काम करायला आवडेल?

बरेच आहेत. सगळेच नवीन लोक खूप छान काम करत आहेत. जर एखादी कथा चांगली असेल तर नक्की.


तुम्ही मराठी/हिन्दी सोडून इतर भाषेमध्ये काम करताना ते express करणं कसं साधता?


सिनेमाच्या बाबतीत मी dialogues देवनागरीमध्ये लिहून पाठ करतो. नाटकाच्या बाबतीतही तसंच झालं होत. गांधी विरुद्ध गांधी गुजरातीमध्ये करताना. पण त्यासाठी काही महिने अगोदर मेहनत सुरु केली होती. आणि फेक आणि pauses ची तयारी खूप केली होती.

तुम्हाला वाचनाची आवड आहे. तुमची आवडती पुस्तकं कोणती आहेत?

ते बदलत राहिलं आहे. वयाप्रमाणे, येणाऱ्या अनुभवांमुळे ते बदलत गेलं आहे. असं constant काही नाही आहे. जे पूर्वी आवडलं ते आता आवडतं असं नाही. भविष्यातही असंच असेल.

Quest बद्दल काही सांगाल का?

मला नेहमीच असं वाटत आलं आहे की आपल्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्याच मूळ हे शिक्षणाच्या अभावात आहे. आणि फक्त माझंच नव्हे तर अनेक researchers नी हे अभ्यासावरुन मांडलेलं आहे. शिक्षण, especially प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक त्यावर तुमची जडणघडण अवलंबून असते. बऱ्याच problems चा तो root असतो. इथे ह्याचा marks हा अर्थ अभिप्रेत नाहीये. आपल्याला इतिहास, भूगोल आणि गणित हे विषय का शिकवले जातात, आपली स्वतंत्र विचारांची प्रक्रिया तयार व्हावी आणि rational thinking करायला शिकावं यासाठी हा या शिक्षणामागचा हेतू असतो. फक्त गणित, भाषा येणं हा त्यामागचा हेतू नसतो. त्यामुळं मला असं वाटलं की ह्या क्षेत्रात आपल्याकडे भरपूर सुधारणांची गरज आहे. कारण दुर्दैवाने आपल्याकडे ज्या profession ला सर्वात जास्त महत्त्व हवं त्याला आणि त्या professionals ना काहीच किंमत नाही आहे. काहीच नाही ना जमत तर मास्तर हो. त्यामुळं आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे. केवळ परिक्षार्थी शिक्षणपद्धती झाली आहे, केवळ marks डोळ्यापुढे ठेवून शिकलं जातं किंवा तो शिक्षणाचा हेतू मानला जातो. त्यासाठी आम्ही काही समविचारी मंडळींनी ही संस्था स्थापन केली आहे. Quality Education Support Trust नावाची. सोनाळे नावाचा जो आदिवासी भाग आहे ठाण्याजवळ वाडा तालुक्यात, तिथे आम्ही दहा/बारा गावांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. तिथे आमचा base आहे. आधुनिक शिक्षण पद्धती आम्ही वापरतो, traditional पेक्षा. निलेश निंबकर म्हणून आमचे director आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं राबवतो. एक प्रकारचा बदल आम्ही करू शकतो का as far as quality of education is concerned असा आमचा प्रयत्न आहे.आणि तुमच्या ह्या उपक्रमाला बाहेरुन मदत शक्य आहे का, आणि ती कशी करता येइल?


अर्थात अंतर खूप असेल तर donations हा एकच मार्ग राहतो. तो एक सोपा मार्ग आहे. मदत तर हवी असतेच. आत्ता आमची अडचण अशी आहे की परदेशी असलेल्या लोकांना जर मदत करायची असेल तर परदेशातून direct मदत नाही स्विकारता येत त्या currency मध्ये. कारण आमचा अजून FCRA, Home ministry ची एक permission लागते जी काही वर्षांनंतरच मिळते. ती एक मोठी process आहे पण indian currency मध्ये जर काही मिळाले तर जरूर स्विकारू शकतो.Help Quest!

संवाद - डॉ. आगाशे

संवाद - डॉ. आगाशे

- डॉ. प्रशांत खापणेआपण बर्‍याचदा एक तक्रार ऐकतो. मला आहे तेच खूप झाले आहे, मला हल्ली वेळच मिळत नाही. त्यामुळं डॉ.आगाशेंसारखे लोक दोन-दोन क्षेत्रात तितकीच उल्लेखनीय कामगिरी कसे करू शकतात याचं आश्चर्य होतचं. ते बराच काळ FTII सारख्या मान्यवर संस्थेचे मुख्याधिकारी होते त्याचबरोबर MIMH (Maharashtra Institute of Mental Health) चे सुद्धा संस्थापक आणि डिरेक्टर होते. निळू फुले, डॉ. लागू , विजय तेंडुलकर, डॉ. जब्बार पटेल, स्मिता पाटील ह्यांसारख्या मराठी नाट्य-आणि चित्रपटस्रुष्टीतील मात्तब्बर कलाकारांबरोबर केलेलं काम अतिशय गाजलेलं आहे.फ्रॉइडचं 'Analysis of Dreams' माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. ते वाचलं होतं मी खूप पुर्वी. तेंव्हा उमगलं कमी आणि अजुनपर्यंत काही शंका तश्याच राहून गेल्या होत्या. मला नाटक बघण्याची आणि जवळच्या काही मित्रांना नाटक सादर करणं ह्याची आवड असल्याने काही जुणी नाटकं बघणं, त्यांच्याबद्दल जमेल तितकी माहिती मिळवणं ह्याची आवड आहे. तेंडुलकरांच्या 'सखाराम' बद्दल गिरीश कर्नाडनी असं म्हंटल आहे की असं नाटक गेल्या हजार वर्षात भारतीय रंगभूमीवर झाले नाही. त्यांची 'घाशीराम-सखाराम' जोडी म्हणजे भारतीय रंगभूमीचे जगाच्या रंगमंचावरचे प्रतिनीधी मानले जातात. ज्या काळात ही दोन नाटकं मराठी रंगभूमीवर आली त्याचे सक्रिय साक्षिदार मोहन आगाशें. त्यामुळं त्यांच्याशी बोलताना कलाकार-मानसशास्त्रज्ञ मोहन आगाशें हा द्वंद्व समास चालवता येणार याचा आनंद तर होताच होता. पण त्याचबरोबर ज्याला मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणता येईल अश्या काळातल्या काही कलाकारांबददल त्यांच्याशी बोलता येणं हा खरंच दुग्ध-शर्करा योग. दिवाळी अंकाची कल्पना त्यांच्या कानावर घातली आणि मुलाखातीबद्दल विचारले. त्यानी लगेच अमेरिकेतला आणि भारतातला फोन नंबर दिला आणि वेळही.


नमस्कार डॉ.आगाशे. आपण दिलेल्या वेळेबद्दल आणि 'पालवी' च्या पहिल्या मुलाखतीबद्दल मी आपला खुप आभारी आहे. यातले काही प्रश्न आहेत डॉ.मोहन आगाशेंना आणि काही आहेत कलाकार मोहन आगाशेंना.


नमस्कार. अंकाबद्दल शुभेच्छा...विचार प्रश्न.


डॉ.मोहन आगाशें आणि कलाकार मोहन आगाशें यांच्यातली सांगड तुम्ही कशी घालता? म्हणजे डॉ.मोहन आगाशेंना कधी आपण "गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या A Wrong Man in Workers Paradise" सारखे वाटले का?आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपल्याला कमी कळत असतं, म्हणजे अनुभव कमी असतो. आई-वडिलांना पण ठराविक channels माहिती असतात. मार्क्स पडले तर engineer किंवा doctor होणे हा एकच मार्ग. म्हणजे घोड्यासारखं- झापडं लावली आहेत जा पुढे. आजकाल मात्र internet मुळे महिती खूप असते, पण त्यामुळे गोंधळ देखिल तितकाच. त्यापेक्षा चुकीच्या पण एकाच मार्गाने जाणे बरे असे मला वाटते.

सुदैवाने हे लवकर लक्षात आलं, त्यामुळं psychiatry करण्याचा निर्णय घेतला. एक प्रकारची stability आली.

देवाने बघं आपल्याला दोन डोळे, हात, आणि पाय कशासाठी दिलेत. मेंदुचे देखिल identical दोन भाग आहेत. प्रत्येकाचे काम ठरलेले आहे. त्यांमुळं balance येतो. एक पाऊल मागे, तर एक पुढे. त्यामुळं जीवनाचा प्रवास दोन चाकांवर झाला तर बरं असं नेहमीच वाटलं. पण हे दोन पाय एकाच माणसाचे असलेले बरे, नाहीतर तर तीन तंगड्यांचा तमाशा... लग्नानंतर होतो तसा. काय?

त्यामुळं असं conflicting नव्हतं कधी वाटलं. जेव्हा junior होतो, संध्याकाळी वेळ असायचा तेव्हा theater खूप केलं. नंतर senior झाल्यावर department devolpment च्या वेळी चित्रपट केले. नंतर ह्या सगळ्याचा balance करण्याचा प्रयत्न केला.तुम्हाला रंगमंचाची आवड केव्हा पासून आहे? म्हणजे पहिले नाटक केव्हा केलेत?लहानपणापासुन. मला वाटते सगळ्यांनाच असते लहानपणी. आई-वडील पहिले प्रेक्षक. त्यांनी प्रोत्साहन दिले तर मग पुढं चालू. त्यामुळं बलोद्यान, गणपतीचे मंडळ असो, पुढे शाळा, कॉलेज असं ते चालू राहीलं. प्रत्येकजण ते कुठल्या ना कुठल्या stage ला सोडून देतात. पण ही मैत्री सुटली नाही. किंवा सोडली नाही असं म्हण.


मला घाशीराम कोतवाल बद्दल प्रचंड आकर्षण होते आणि आहे. अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत त्याची VCD मिळणे दुरापास्त होते. त्या पूर्वी तर पुण्यात सुद्धा त्याचे प्रयोग लपून छपून झाल्याचे मी ऐकले आहे. घाशीरामला झालेला ब्राम्हण समाजाचा विरोध, मध्यंतरी 'फायर' ला झालेला विरोध असो अथवा अगदी परवा परवा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' च्या show नंतर लोकांनी दिलेल्या घोषणा हे सगळे काय दर्शवते असे तुम्हाला वाटते?अरे तू काल इथे असायला हवा होतास. ह्या विषयावरच बोलणं झालं काल. clips दाखवल्या. घाशीराम वर बोलायचं तर मुलाखातीचा वेळ पुरणार नाही.

विरोध म्हणण्यापेक्षा controversy म्हणू. प्रयोग मात्र लपून-छ्पून कधीच नाही झाले. ३५ एक लोकांचा संच, कसा करणार लपून-छ्पून?

पण आपल्याकडे कुठ्ल्याही गोष्टीचा issue करणे, उगाचाच जाळपोळ, पोस्टर फ़ाडाफ़ाडी ही प्रवृत्ती जास्त. नाटक हे काही इतिहासाची बखरं नाही. पण ही प्रगल्भता नाही. कुणीही पेटवलं की पेटतात.

त्यामागे फार मोठी history आहे. खरा राग होता तेंडुलकरांवर. त्यानी सखाराम बायंडर आणि घाशीराम एकाच वेळी लिहिलं. त्यामुळं सखाराम बंद पाडलं गेलं, प्रकरण कोर्टात गेलेलं. केस जिंकली, ठाकरेंसाठी प्रायोग ही झाला. ते पहिल्यावर खूष झाले आणि मग ते पुन्हा सुरु झालं. पण घाशीरामचे प्रयोग कधी नाही बंद पाडले गेले.

आम्हाला ते कोर्ट वगैरे जमलंही नसतं. घरचेच प्रश्न आम्हाला खूप होते, नाटक देखिल हौशी लोकांच त्यामुळं थोडा काळ बाहेर पडलो. नंतर केकटनी नावाची संस्था काढली, खिशातलेच पैसे टाकून नाटक revive केलं. पुढं बर्लीनच्या प्रयोगाला अशीच controversy झाली. आम्हाला वाटलं नाना फ़डणीस फ़क्त नानावडीच्या लोकांना माहीती.नाना फडणवीस ऐवजी आणखी कुठली भूमिका तुम्ही केलीत काय? किंवा करावी अशी वाटली का आणि का?
घाशीरामची. खरंतर तेंडुलकरांना माझा घाशीराम फ़ार आवडला नव्हता. त्यांना तो फ़ार powerful नाना वाटत होता. त्यांची इच्छा होती की मी घाशीराम करावा. पण ते कसं आहे माहीती आहे काय तुला, आपला मुलगा engineer व्हावा असं बापाला वाटतं आणि तो भलतच काहीतरी करतो तसं. मग बापाला वाईट वाटतं. त्यामुळं मी त्यांचा नावडता नाना. त्यांना आवडता नाना भेटला अमेरीकेत. तिथे पण production झालं होतं घाशीरामचं. तो एक मोरोक्कन कलाकार होता. त्यांनी ते लिहीले सुद्धा नंतर की मला अपेक्षीत नाना मला अमेरिकेत मिळाला.आपण जर्मनीत ह्या पूर्वी अनेकदा येउन गेला आहात. ऐंशीच्या दशकात तुम्ही जर्मनी (ग्योटिंगन) मध्येही घाशीरामचे प्रयोग केले. तो अनुभव कसा होता? आणि भाषेची अड़चण तुम्ही तेंव्हा कशी सोडवलीत?


अरे, ग्योटिंगन !!! म्हणून तर तुला विचारले परवा कुणी आहे का मराठी तिथे म्हणून. अरे, किती आठवणी. ३० वर्षांपूर्वी जिथे नाचलो होतो त्या stage वर मी seminar conduct करत होतो. मी फ़ार nostalgic झालो होतो.

अरे सगळ्या newspapers मध्ये reviews दुसर्‍या दिवशी. लोकांनी अगदी उचलून धरलं नाटक.

भाषेचं म्हंटलस तर तू तो प्रयोग पाहिला नाहीस म्हणून असं म्हणतो आहेस. एक तर अतिशय सुंदर synopsis केला होता जर्मन मध्ये. choreography आणि music इतकं छान आहे घाशीरामचं त्यामुळं फ़ारशी अडचण नाही आली. लिहलं होतं "Schiller from far east" - will be performed precisely at six. नविन ग्रुप ने केले नाटक पण आई भाजी करते आणि काकू पण करते.


अर्थात विजय तेंडुलकर, डॉ.जब्बार पटेल, आणि भास्कर चंदावरकरांच्याबद्दल बोलल्या शिवाय घाशीरामचा विषय संपवता येणारच नाही. ह्यांच्या बद्दल काही सांगू शकाल का?तेंडुलकर सर्वस्पर्शी माणूस. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार! त्यांचा spectrum बघं. गिधाडे, घाशीराम, अशी पाखरं येती, सखाराम, बेबी, कमला, शांतता कोर्ट चालू आहे, सामना, सिंहासन. किती व्यक्तिरेखा. कुठंही व्यावसायिक द्रुष्टीकोन, पैशाचा लोभ धरुन काम नाही. स्वतःशी प्रामाणिक असलेला नाटककार. राज कपूर पासुन सगळ्यांनी त्यांना approach केल. आमच्यासाठी script लिहा म्हणून. त्यांना ते जमलंच नाही, त्यांचा तो स्वभावच नव्हता. त्यांनी जेव्हा जेव्हा पटकथा लिहील्या तेव्हा चित्रपट गाजले. त्यांनी दिग्दर्शक बनवले. शाम बेनेगल - निशांत, मंथन. गोविंद निहलानी - आक्रोश, अर्धसत्य. पटकथेवर हुकुमत. human psychology ची इतकी जाण न तेही psychology न शिकता. आपल्याकडं लोक बोलतात नुसतं. पण त्यांच्याकडून listening skills शिकलो. त्यांना फ़क्त listening skills म्हणतात हे माहीती नव्हतं इतकच. संवेदनशील किती असलं पाहीजे माणसानं ह्याच सुंदर उदाहरण.

चंदावरकर - कितीतरी नाटकांना संगीत दिलं. पण घाशीरामच काम आठवतं लोकांना. कित्येकांना माहिती नाही FTII ला असताना दिलं त्यानं ते. He was gifted. A good teacher and a theoritician. सितार खूप छान वाजवायचे. 70ies मध्ये he was at his peak. पण अनेक गोष्टी येत असल्यामुळे इतर बाबींकडे लक्ष नाही दिले. तू बघ सामना, आक्रित, तीन पैशाचा तमाशा. अप्रतिम संगीत. नंतर त्यांनी खानोलकरांना श्रद्धांजली साठी नक्षत्रांचे देणे कार्यक्रम जो झाला त्याला त्यांचच संगीत होतं. अमोलने (पालेकर) कविता वाचन केलं. छान कार्यक्रम झाला तो. नुसतं मराठीच नाही इतर भाषातही काम केलयं.

जब्बार बद्दल म्हंटलास तर पहिली कारकिर्द फ़ार सुरेख. घाशीराम, अशी पाखरं येती, तीन पैशाचा तमाशा, पडघम, खेळिया...milestone नाटकं. सामना, सिंहासन, उंबरठा, जैत रे जैत, अगदी अलिकडं आंबेडकर. अरे peak असतो. आपलेपणा तर आहेच पण खूप जवळचे असल्याने राग पण. इतका उत्कृष्ठ दिग्दर्शक पण पडघम नंतर काही नाही केलं. उत्कृष्ठ पण पडद्याआड गेलेला दिग्दर्शक म्हणुन राग येतो.जर माझ्याकड़े पिस्तूल असती तर मी मोदिंवर गोळ्या झाडल्या असत्या ह्या तेंडूलकरांच्या विधानावर डॉ. आगाशेंची प्रतिक्रिया काय होती?

काय देणार प्रतिक्रिया!. ते तसे राजकारणी नसल्याने मनात आलेले बोलले. पण मगाशी तुला म्हंट्ल्याप्रमाणे आपल्याकडे जी प्रभावी शक्ती आहे तिचा वापर कशासाठी करायचा...भावना भडकवण्यासाठी कि आणि कशासाठी हे ठरवणं महत्वाचं. इतरांचा द्वेष करुन तुम्ही हिंदुत्ववादी होऊ नाही शकत. युद्धानं आणि जाळपोळीनं काही सिद्ध होत नाही हे इतिहासानं दाखवून दिले आहे.तेंडूलकरांचे 'शांतता कोर्ट चालू आहे' (Die Panne) किंवा 'अशी पाखरे येती' (The rainmaker), पुलंचे 'एका कोळीयाने' (The Old Man and the Sea) अथवा 'ती फुलराणी' (Pygmalion) , तीन पैशाचा तमाशा (The three penny Opera) अगदी अलीकडचे 'कथा दोन गणपतरावांची' किंवा 'अग्गबाई अरेच्चा' सुद्धा प्रेरीत आहेत. त्या तितक्याच ताकतीच्या कलाकृती आहेत किंबहुना थोड्या सरसच. पण आजकाल प्रेरणा आणि चौर्य ह्यातील सीमा खूप धूसर झाली आहे. ह्याबद्दल तुमचे काय मत आहे?

बाजारीकरण वाढलेलं आहे असं तुझ्या म्हणण्याचा अर्थ होतो, आणि खरं ही आहे. american attitude मुळे शिक्षणाचं, इतकंच काय वैदिक शास्त्राचंसुद्धा बाजारीकरण झालेलं आहे. पुर्वी असं होतं की पैशाचं स्थान कुठल्याही profession मध्ये ठरलं होतं. पण आता पैसा वर जाऊन बसला आहे. त्यामुळं professional identity चा mask फाडला की तर आत पैशाचा चेहरा दिसतो. पुर्वी उलट होतं. आज जाहीरात attractive केली की झालं. पूर्वी जाहीरातचा उद्देश्य लोकांपर्यंत पोहचणे हा होता. आता फ़सवणूकीकडे प्रवृत्ती वाढली आहे. जसं आजकाल ६०० प्रिंट काढून चित्रपट हजार ठिकाणी बाजारात आला की झालं. पैसा वसुल. बुद्धिचा गैरवापर करायला शिकला आहे माणुस.आणि उप-प्रश्न असा की 'अशी पाखरे येती' आणि 'थोडासा रूमानी हो जाए' मधे तुम्ही कशाला झुकतं माप द्याल आणि का?मी ह्यात नक्कीच अशी पाखरे येती ला झुकतं माप देइन. कारण मला वाटते ते आपल्या मातीला फार जवळ आहे. तेंडुलकरांनी लिहलं पण आहे ते छान. rainmaker ही फ़क्त तू म्हंट्ल्याप्रमाणं प्रेरणा होती. पटकथा, पात्रं अगदी आपली वाटावी अशी होती. आपण म्हणतो ना belivable तसं. पालेकर साहेब हे बुद्धीजीवी खरे पण इथे मी अशी पाखरे ला झुकतं माप देइन. आणि दुसरं म्हणजे ती भुमिका करणारा मनुष्य charming हवा. आता नाना हा काही charming असू शकतो असं मला वाटत नाही. music छान होतं. चंदावरकरच होतं."कला ही एखाद्या स्वप्ना सारखी असते. ती स्वतःला कधीच विषद करत नाही आणि ती नि:संदिग्ध नसते" असं कार्ल गुस्ताव युंग ने म्हंटले आहे. ह्यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकू शकाल काय?
सहमत आहे मी. आपण जे reading between the lines म्हणतो ते great work of art चं लक्षण आहे. कुठलंही एक माध्यम काहीही express करायला अपुरं पडतं. प्रत्येक text ला subtext असतं. what you say and what you communicate might be different. आणि ते आपली बलस्थानं काय आहेत त्यावर ठरतं. म्हणुन तर कुणी चित्रकार होतात, कुणी गायक, कुणी actor. कुणी शब्दच्छल करतात. परत घाशीरामचच उदाहरण घे. तसं संदिग्धच आहे ते, नाही का?अगदी अलीकडे दिल्ली हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारावासा वाटतो: एडिपिस मनोगंडाचे जर निराकरण नाही झाले तर त्याचे रूपांतर समलिंगी आकर्षणामधे सुद्धा होऊ शकते असे फ़्रोइडने Die Traumdeutung मध्ये लिहिले आहे. ह्या बद्दल काही सांगाल का आणि समलिंगी आकर्षण अनैसर्गिकच मानले पाहिजे का? नसेल तर मग मानसशास्त्रामध्ये त्याला मनोगंड का मानले जाते?expression differs from culture to culture. युरोपमध्येसुद्धा पूर्वी त्याला sexual disorder च म्हणायचे. तू 'एका छोट्याश्या सुट्टीत' हे नाटक पाहिलं असशीलच किंवा तेंडुलकरांचे 'मित्राची गोष्ट'.

इथं दोन गोष्टी आहेत, नैसर्गिक काय आणि कायद्याने कशाला मानत्या दिली आहे. समलिंगी काय किंवा विरूद्धलिंगी आकर्षण असण्याबद्दल काही नाही पण त्याची परिणिती रस्त्यावर कशात होते हयाचे थोडे भान ठेवले पाहीजे. मी परवा इथे न्यु-जर्सी मध्ये cultural confusion of Asians वर बोललो तिथेही अश्याच धर्तीवर बोलणे झाले. मजेची गोष्ट म्हणजे इथे verbally express करण्यावर जोर, आपल्याकडे नवरयाने बायकोला 'I love you' किंवा असं काही म्हंटल तर तिला वाटतं काय लफ़डबिफ़ड तर नसेल ना? so when we talk of law - we talk of group of people. And what is acceptable at that particular time and place.

आणि freud चं म्हंट्लास तर त्याने ही एक system शोधुन काढली which was hypothetical. तू वाचलं असशीलच पुस्तकात त्यानं ego-superego अश्या structure बद्दल लिहीलं आहे. कुठलंतरी hypothesis मान्य केल्याखेरीज पुढचं logic चालवू शकत नाही आपण. जसं अंकगणितात १ ते ० मान्य केल्याखेरीज पुढे उपयोग होत नाही. but he was also a biologist. त्याचं मत होतं की biology मध्ये याचं उत्तर सापडू शकेल. तर ह्या complex मुळे मेंदुच्या एका भागाची वाढ नाही होत. म्हणुन समलिंगी आकर्षण वाटू शकतं असं biological explanation देता येइल.तुम्ही कुंडली वर विश्वास ठेवता का? म्हणजे नक्षत्रं आणि तारे आपल्या स्वभावावर परिणाम करतात ह्या वर विश्वास ठेवता का?ज्याबद्दल मला माहीती नाही त्यावर कसं बोलणार? विश्वासाचा मुद्दा आला की sustention of intelligence आलं!मानसशास्त्रामध्ये स्वभावाला औषध आहे का? आणि तसे असते तर दोन्ही गणपतरावांना त्याचा फायदा झाला असता का?हा..हा..हा !! दोघांच logic आठवतंय का तुला?

एक म्हणतो - मैत्री राहुदे, सौदा करू. भाताची पोती देतो. मग दुसरा म्हणतो नाशवंत पोती, त्याचा काय उपयोग? त्यावर पहिला म्हणतो - बहिर्‍या माणसाला कानाचा उपयोग नाही म्हणून काय तो कान कापून घेतो का?

वनारसेबाईंनी एक पुस्तक लिहीलं आहे - स्वभावाला औषध आहे! मानसशास्त्रही सांगते तसं. म्हणजे स्वतःला बदलण्याची ईच्छा असेल तर शक्यही आहे. पण एक लक्षात ठेवावं - आंब्याची कोय लावून काही द्राक्ष येत नाहीत. तशी अपेक्षाही ठेवण चुकीचं.


तुम्ही स्वतः सुन्दर कथाकथन करता...अगदी साभिनय सादर करता. तुमची आवडीची पुस्तके कोणती? अणि आवडते लेखक कोण?वाचन कमीच तसं माझं. फ़ारच कमी. ते वेड कमीच. आणि आयुष्यात वेगवेगळ्या stages मध्ये वेगवेगळी पुस्तके भावतात. किंवा एकच पुस्तक वेगवेगळ वाटतं. पु.शि.रेग्यांच एक पुस्तक आहे 'सावित्री' नावाचं. छोटं पुस्तक आहे. एका बाईनं पुरुषाला लिहिलेली ३९ पत्रं आहेत त्यात. सुंदर. पु.लं., तेंडुलकर आवडतात...पण आपली मर्यादा पण असते एक. जग सगळं बघून नाही होत एका आयुष्यात.तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेत तर त्यांच्या बरोबर काम करतानाच्या काही आठवणी आहेत का? आणि तुम्ही स्वतः दिग्दर्शनाचा प्रयत्न केलात का?
तसं फोनवर सांगण अवघड आहे. पुन्हा भेटुच आपण तेव्हा प्रत्यक्षच बोलू.

दिग्दर्शनाचा प्रयत्न केला. पण फ़ारसा काही यशस्वी नाही झाला. प्रार्थना नावाची एकांकिका होती. पण फ़ार नाही जमून आलं सगळं. त्यापेक्षा आपली acting बरी.आणि शेवटचा प्रश्न - मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न तुम्हाला कधी विचारला गेला का? आणि त्याचे तुम्ही आज काय उत्तर दयाल?

विचारतात अजुनही गमतीने. उत्तर - मारुती कांबळे न्यु-जर्सी मध्ये दिसले होते...किंवा अलिकडे मारुती कांबळेंना काही लोकांनी मुनिक मध्ये पाहिलं. काय?

Saturday, May 14, 2011

Game of thronesThere are few books I always wanted to see adapted for big screen. Lord of the Rings was one such. However I always felt that such an adaptation would be a failure. All the previous attempts at the fantasy of such a scale had been mediocre. Tacky effects, low budgets, poorly made up characters. And the man at the helm (Peter Jackson) was previously known for all that combined together. Fortunately I was proven wrong. Credit also due to Fran Walsh for a fantastic screenplay and to some extent the success of Harry Potter books for it rekindled the interest of many in the trilogy written in the 1930ies (and number of other fantasy books). Rest is as they say is history.

A Song of Ice and Fire is a series fantasy novels by George R. R. Martin. It was very clear that it would be very difficult to see this on big screen. The story consists of lot of subplots and any 3+ hour version would have done no justice to the written work. At the same time a TV-serial of such a scale was difficult to imagine (but not impossible). It would have called for a much higher production value.
All I can say is - I'm impressed. What a fantastic way to see the story unfolding on a TV-screen. This is one TV-serial which makes me 'want' a huge TV at home.

Highly recommended!!
My ranking - 10/10.
and that of imdb


Saturday, April 2, 2011

02.04.2011, rendezvous with the destiny

It is not the critic who counts;
not the man who points out how the strong man stumbled
or where the doer of deeds could have done them better.
The credit belongs to the man
who is actually in the arena,
whose face is marred by dust and sweat and blood;
who strives valiantly;
who errs and comes short again and again;
who knows great enthusiasms,
the great devotions;
who spends himself in a worthy cause;
who at the best, knows in the end the triumph of high achievement,
and who, at the worst, if he fails, at least fails while
DARING GREATLY
so that his place shall never be
with those timid souls
who know neither victory or defeat.---Theodore Roosevelt


It is this being in the arena quality that separates you from everybody else. To me an honest trier who unfortunately was always surrounded by lesser talent or those lacking the iron will needed to succeed at the highest level. Yet, you being there coincided with the 'New India' gaining confidence as a country and the youth of the 90ies. And you are still there inspiring the kids of those younglings of the 90ies.

I still remember that dreadful semi final against the same opponents where when you went so did the will to get into the finals of the most important event in the cricketing world. The trend continued for another 5-6 years.
Things did start changing at the turn of the century when that very very special innings and 'more than a bridesmaid' effort changed the face of the team. It was the beginning of the rise to the numero uno.

You still kept inspiring the new generation of cricketers and virtually carried the team to finals of the south african bonanza. Unfortunately the first over of both the innings sealed the fate of the match. Was it the pressure of performing batting second, chasing the 359 against the best team, or you wanting to finish the game in the first over itself? We will never know. Given your tacit approach we may have to wait till you hang the boots. Will that be the day today? Who knows. However nobody wants the dream to end. Not the greedy viewer like me. However I'm sure it will be you who will call it right. And will prefer to end it like one.

Will that be a 100 of a 100?
I hope.


Will that be the 'cup that counts', the only missing feather in your cap, the one cup which inspired you to play for the country!
Oh, how I wish. For finally you have the team that has the iron will to fight it out, that thinks and believes it is a team sport.


In any case a simple thank you is in order irrespective of the outcome of today's rendezvous. Thank you for inspiring a generation wishing for a son like you, inspiring generations to have the self belief to succeed at the highest level.

And a big thank you for being SACHIN RAMESH TENDULKAR for I believe what Prem Panikar has written once -
If a Tendulkar didn't exist, we might have had to invent him.

Dr. Prashant Khapane
www.prashanteju.de

Friday, February 18, 2011

A decade that was....

Best movies

Best books

Best sport moments

more to follow

Share it !!