Wednesday, August 17, 2011

संवाद - अतुल कुलकर्णी


- तेजू खापणे

संवाद - अतुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत खापणे


’मला हे करायचे नाही आहे. मी हे करणार नाही.’ असं करणारी माणसं मला भावतात. वरवर पाहता ती बऱ्याच जणांना ’येडी’ किंवा मूर्ख वाटू शकतात. पण असेच लोक नवीन वाटा निर्माण करतात. पुण्याच्या कॉलेजात प्रवेश मिळूनसुद्धा मला इंजिनीयरिंग नाही शिकायचे आहे, मला ते नाही आवडत असं म्हणून ते खरोखर सोडून देणारे आणि आपल्याला काय आवडते हे शोधून त्या क्षेत्रात काहीतरी करू म्हणून त्याचे प्रशिक्षण घेऊन, नंतर गांधी विरुद्ध गांधी, ख़राशें, चांदणी बार, दहावी फ, देवराई, सत्ता, रंग दे बसंती, वळू अशा एकापेक्षा एक कलाकृती सादर करणारे ’नटरंग’ अतुल कुलकर्णी यांच्याशी ह्या वर्षी गप्पा मारायला मिळाल्या. पालवी दिवाळी अंकासाठीच्या ’संवादा’साठी दिलेल्या वेळेबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

नमस्कार. ’नटरंग’ च्या भरघोस यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. अतुल, तुम्ही बेळगाव - सोलापूर - पुणे - दिल्ली ह्या प्रवासाबद्दल काही सांगू शकाल का?

मी ११-१२ वी बेळगावला केली, नंतर पुण्याला engineering ला admission घेतली. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की ते नाही जमणार आहे मला, तर मग ते सोडून सोलापूरला गेलो. तिथे B.A. ला ऍडमिशन घेतली. तिथे असताना ’नाट्य आराधना’ नावाच्या ग्रुपमध्ये काम सुरु केले. आणि माझ्या लक्षात आले की मला ह्याचीच आवड आहे आणि हेच करायचे आहे. मग दिल्लीला National School of Drama मध्ये admission घेतली professional actor होण्यासाठी. तिथे ३ वर्षे होतो आणि मग मुंबईत आलो as a professional actor.

मग शाळेत असताना तुम्ही ’फ’ तुकडीचे विद्यार्थी होता की ’अ’? आणि तुम्हाला ’देशमुख’ सरांसारखे कुणी शिक्षक भेटले का?

मी ’अ’, ’ब’ तुकडीतच होतो. आमच्या शाळेमध्ये जे वरचे क्लास होते त्या उतरांडीमध्येच होतो. असे शिक्षक अर्थातच असतात पण मी ’फ’मध्ये नसल्याने मला स्वतःला तसा अनुभव नाही.

आपल्याकडे अशी म्हण आहे की ’यशाचे धनी खूप असतात पण अपयशाचे वाली आपण स्वतःच असतो.’ तुम्ही engineering सोडायचे आहे किंवा नंतर NSD ला admission घ्यायची आहे हे निर्णय घेताना भीती वाटली होती का? घरच्यांची प्रतिक्रिया काय होती?

भीती म्हणण्यापेक्षा insecurity म्हणू, पण ती अर्थातच होती. कारण माहिती नव्हतं काय होणार पुढे. आणि तेव्हा असंही ठोसपणे ठरलं नव्हतं की acting मध्ये जायचे आहे वगैरे. त्यामुळं insecurity नक्कीच होती. घरच्यांना अर्थातच काळजी होती की आता याचे काय होणार. कारण profession वगैरे काहीच दिसत नव्हतं. आणि आपल्याकडे B.A.ला फारशी किंमत नसते दुर्दैवाने.

तुमचं गांधी विरुद्ध गांधी हे पहिलं professional नाटक. त्यानंतर ख़राशें. त्याचा अनुभव कसा होता? त्यातली एखादी आवडती कविता आहे का तुमची?

हो. बरंच नवीन शिकायला मिळालं. ख़राशें हे गुलजार साहेबांच्या कथा आणि कवितांचा एक कोलाज आहे जे आम्ही गेले ६/७ वर्षे करतो आहे. त्यात मी खौफ़ नावाची एक गोष्ट सांगतो आणि काही कविता सादर करतो. ६/७ जण आहोत आणि मिळून त्या चार कथा आणि कविता सादर करतो. गुलजारसाहेबांनी आत्तापर्यंत जे काही communal riots आणि फाळणीच्या वेळी झालेल्या अत्याचाराबद्दल, जाती/धर्मावरुन जे काही दंगे झाले आहेत भारतात त्यावर त्यांचं भाष्य आहे. त्या background वर आधारित आहे ते. दुर्दैव इतकेच आहे की आम्ही ६/७ वर्षे ते सादर करतो आहोत पण परिस्थितीत काही बदल नाही. त्यामुळं तो कार्यक्रम जेव्हा irrelevant होइल तो खरा आनंदाचा क्षण असेल आम्हा सर्वांसाठी.

अनेक कविता आवडतात त्यातल्या. खरंतर सगळ्याच. पण मला वाटतं तो एक त्या कथा आणि कविता असा मिळून पूर्ण अनुभव आहे. तो जास्त आवडतो.

तुम्ही आत्तापर्यंत अगदी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. शेष (देवराई) किंवा गुणा (नटरंग) सारख्या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनाही हेलावून सोडतात. पण एक कलाकार म्हणून इतके दिवस ती व्यक्तिरेखा जगल्यानंतर emotional attachment होते का आणि ती काही ख़राशें सोडून जाते का?

मी खरंतर त्या पद्धतीचा नट नाही आहे. मला असं नाही वाटत की भूमिका तुमच्यावर परिणाम करतात किंवा त्यांनी करायला हवा. तुमच्यात काही बदल होणं ती व्यक्तिरेखा सतत सादर केल्यामुळं शक्य आहे, स्वाभाविक आहे पण तो वैचारिक मुद्दा आहे, intellectual मुद्दा आहे. तो emotional मुद्दा नाही वाटत मला. उलट मी अशा पद्धतीच्या acting च्या विरोधात आहे. एखाद्या भूमिकेने तुमच्यावर परिणाम केला नाही पाहिजे असं माझं मत आहे कारण शेवटी अभिनय एक तंत्र आहे. त्याच्यात तंत्राचा खूप वापर असतो. अगदी १००% नसला तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळं असं हरवून जाणं मला स्वतःला मान्य नाही किंवा ती माझी अभिनयाची पद्धत नाही असं म्हणू हवं तर. पण अर्थातच तुम्ही एखादी भूमिका सादर करता तेव्हा तिचा अभ्यास करता. उदाहरणार्थ मी गांधींची भूमिका करतो तेव्हा तिचा अभ्यास करतो आणि त्या विचारसरणीचा माझ्यावर, माझ्या विचारप्रणालीवर परिणाम होणं शक्य आहे. पण हे तुम्हाला प्रत्येकवेळी ठोसपणे सांगता येईल असं नाही. पण हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही नटच असायला हवं असं नाही. मी एक साधा वाचक म्हणून जरी काही वाचलं तरी त्याचा माझ्यावर परिणाम होतच असतो. त्यामुळं एक general व्यक्ती म्हणून परिणाम होणं सहज शक्य आहे. एक अर्थातच असतं की आमची intensity जास्त असते. मला एक नट म्हणून ती स्वतः सादर करायची असते. त्यामुळं त्या intensity चा तसा जास्त फायदा मला होतो, एक नट म्हणून. मी त्यातून स्वतःच गेल्यामुळं. पण असं होणं शक्य असतं. बऱ्याचदा अनुभवांचा, माहितीचा आपल्यावर परिणाम होत असतो. ते सहज शक्य आहे. ते आमच्याही बाबतीत होतंच.

प्रेक्षकांचं असं असतं की जे काम आम्ही सहा/आठ महिने केलेलं असतं ते २/३ तासात त्यांच्यासमोर सादर होतं. त्या एका capsule मध्ये ते बघितलं जातं. आणि दुसरं म्हणजे तिथंही सूक्ष्मपणे बघितलं तर emotional परिणाम हा थोडावेळच असतो बाकीचा जो असतो तो intellectual पातळीवरचा असतो. पण त्यातून जी माहिती, ज्ञान मिळतं ते दूरगामी असतं. अर्थात तुम्ही जे पाहता ते आमच्या आयुष्यात ६/७ महिन्याच्या period मध्ये spread झालेलं असतं. अर्थातच त्याचा एक strain असतो, नाही असं नाही. पण काही गंभीर परिणाम होतात किंवा व्हावे असं मला नाही वाटत. निदान माझी तरी अभिनयाची तशी पद्धत नाही.

आणि त्या सादर करताना तुम्ही पूर्वतयारी कशी करता?

मला असं नेहमीच वाटत आलंय की जी script असते ती तुम्हाला सांगते की काय पद्धतीची तयारी हवी. सगळ्याच सिनेमांना एकसारखी तयारी लागते असं नाही आहे किंवा एकच पद्धत आहे असेही नाही आहे. मग तुम्ही एकदा script हातात घेतली आणि पुन्हा पुन्हा वाचली की लक्षात येतं की कशी आणि कुठून तयारी करायला हवी. आपोआप कळतं. आणि अर्थातच दिग्दर्शक असतोच तुमच्याबरोबर, तो तुम्हाला guide करतोच.

एखादी व्यक्तिरेखा आहे का ज्याच्याशी तुम्ही स्वतःला relate करु शकलात?

प्रत्येक character तसं असतं. कारण प्रमाण वेगवेगळं असलं तरी काही traces असतात. आपण अनेक स्वभावांचे मिळून एक बनलेलो असतो. त्यामुळं प्रत्येक character मध्ये थोडे फार आपण दिसतोच. त्याचं प्रमाणं अर्थातच वरखाली होतं. मला बघतानाही आणि सादर करतानाही असं नेहमीच वाटतं कारण आपणही माणूस आहोत आणि ते character ही. त्यामुळं ते relation होतच कुठे ना कुठे.

नटरंग साठी घेतलेली बाह्यतयारी तर आता सर्वमुखी आहे. पण इतर तयारी कशी केलीत?

मी मघाशी म्हटल्याप्रमाणे script हे एक मोठं हत्यार असतं. त्याचा वापर, उपयोग अर्थातच झाला. आणि नटरंगच्या बाबतीत आणखी एक होतं ते म्हणजे ही कथा एका कादंबरीवर आधारित आहे तर त्याचं वाचण अर्थातच झालं. समजून घेण्यासाठी. तर मुख्य ह्याच दोन गोष्टी होत्या. आनंद यादवांशी खूप चर्चा झाली ज्यानी ही कादंबरी लिहिली आहे. रवि अर्थातच बरोबर होता. गुरु ठाकूर जो लेखक आहे त्याच्याशीही. काही जुने तमाशाप्रधान सिनेमे पाहिले. हेच तयारीचे मुख्य स्रोत होते. Choreographer फुलवा खामकरची ही खूप मदत झाली. आमच्या बरोबर एक assistant होता जो सतत बरोबर असायचा शूटिंगच्या वेळेला. तो कोल्हापूरचाच होता. त्याला मी dialogues बोलायला लावायचो. ते कानात साठवून मग shot द्यायचो. त्याची खूप मदत झाली.

नटरंग स्विकारताना गुरु ठाकुरांच्या शब्दात सांगायचं झालं तर 'आज दिली बघं नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे' असं वाटलं होतं का?

भीती अशी नव्हती वाटली. पण in a sense ते कसं सादर करणार हे माहिती नव्हतं. त्या अर्थाने एक anxiety, भीती होती. मला तेच रोल आवडतात जे मला घाबरवतात त्या अर्थाने. कारण माहिती नसतं हे आपण कसं करणार हे. पण तशी शंका होती असं मला नाही वाटतं. पण प्रचंड मेहनत लागणार आहे हे माहिती होतं. ते challange नक्कीच होतं.मला अजून आठवतं आहे, college मध्ये असतानाची गोष्ट आहे. माझा मित्र आणि मी पहिल्या दिवशीचा दोघी चित्रपट पाहायला गेलो होतो. आम्हाला पैसे परत देऊन उत्तर मिळाले, परवडत नाही दोघांसाठी कशाला लावू? आणि गेल्या काही वर्षात वेगळं चित्र दिसतं आहे. सैफ़ 'लंगडा त्यागी' करु शकतो, अमिताभ बच्चन 'पा' किंवा 'मनू (अक्स)' सारखे character सादर करु शकतात आणि ते चित्रपट चालतात. तर तुम्हाला वाटतं का की viewer has gotten mature now and these are exciting times for film industry, marathi in particular?


Definitely. These are exciting times. आणि मराठी किंवा इतर भाषेतल्या चित्रपटांसाठी तर विशेष करुन. कारण कसं असतं की audience also goes through social, economical, political and education changes. त्यावर सांस्कृतिक समज किंवा बदल अवलंबून असतो. अलिकडे जे काही भारतात बदल झाले आहेत त्यामुळे आणि exposure मुळे म्हणा, त्यांना वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळतात. त्यामुळं बदल नक्कीच झालेले आहेत. ज्या पद्धतीचा सिनेमा पूर्वी होता तसा आता बनत नाही. अर्थात ती सगळ्यात उत्तम phase होती का हे भूतकाळात बघावं लागतं. चालू असताना आपल्याला कळत नाही की हे कसं पुढे जाणार आहे वगैरे वगैरे. इथून जिथेही जाऊ ते एका चांगल्या पातळीवर जाऊ याची खात्री मला नक्कीच वाटते.

अतुल, तुमच्या चित्रपटांचं एक वैशिष्ठ्य असं असतं की strong storyline, character. पण एखादा असा कलाकार आहे की ज्याला तुम्ही irrespective of the story, character पाहू शकता?

कितीतरी लोक, कलाकार आहेत. अमिताभ बच्चन उदाहरणार्थ. त्यांनी कितीतरी वाईट roles अगदी convincingly केल्या आहेत. त्याला एक वेगळं skill लागतं. I have always respected him for that. त्यांनी अत्यंत stupid गोष्टी अगदी convincingly लोकांसमोर मांडल्या आहेत. आणि हे फार मोठं skill आहे.

तुमची पहिली एकांकिका ही विनोदी एकांकिका होती, त्यानंतर अलीकडे वळूमध्ये तुम्ही एक हलका/फुलका role केलात. तर तुमचे आवडते विनोदी चित्रपट कुठले आहेत आणि पुन्हा एखादा विनोदी role करायला आवडेल का?

खूप आवडतात. गोलमाल खूप आवडतो. हृषिकेश मुखर्जी/गुलजार साहेबांचा. खूप वेळा पाहिला आहे आणि पाहू शकतो परत परत. अंगूर आहे गुलजार साहेबांचा. तो ही आवडतो. नक्की आवडेल अशा एखाद्या हलक्या/फुलक्या पिक्चरमध्ये काम करायला.

आणि कुठले दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर काम करायला आवडेल?

बरेच आहेत. सगळेच नवीन लोक खूप छान काम करत आहेत. जर एखादी कथा चांगली असेल तर नक्की.


तुम्ही मराठी/हिन्दी सोडून इतर भाषेमध्ये काम करताना ते express करणं कसं साधता?


सिनेमाच्या बाबतीत मी dialogues देवनागरीमध्ये लिहून पाठ करतो. नाटकाच्या बाबतीतही तसंच झालं होत. गांधी विरुद्ध गांधी गुजरातीमध्ये करताना. पण त्यासाठी काही महिने अगोदर मेहनत सुरु केली होती. आणि फेक आणि pauses ची तयारी खूप केली होती.

तुम्हाला वाचनाची आवड आहे. तुमची आवडती पुस्तकं कोणती आहेत?

ते बदलत राहिलं आहे. वयाप्रमाणे, येणाऱ्या अनुभवांमुळे ते बदलत गेलं आहे. असं constant काही नाही आहे. जे पूर्वी आवडलं ते आता आवडतं असं नाही. भविष्यातही असंच असेल.

Quest बद्दल काही सांगाल का?

मला नेहमीच असं वाटत आलं आहे की आपल्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्याच मूळ हे शिक्षणाच्या अभावात आहे. आणि फक्त माझंच नव्हे तर अनेक researchers नी हे अभ्यासावरुन मांडलेलं आहे. शिक्षण, especially प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक त्यावर तुमची जडणघडण अवलंबून असते. बऱ्याच problems चा तो root असतो. इथे ह्याचा marks हा अर्थ अभिप्रेत नाहीये. आपल्याला इतिहास, भूगोल आणि गणित हे विषय का शिकवले जातात, आपली स्वतंत्र विचारांची प्रक्रिया तयार व्हावी आणि rational thinking करायला शिकावं यासाठी हा या शिक्षणामागचा हेतू असतो. फक्त गणित, भाषा येणं हा त्यामागचा हेतू नसतो. त्यामुळं मला असं वाटलं की ह्या क्षेत्रात आपल्याकडे भरपूर सुधारणांची गरज आहे. कारण दुर्दैवाने आपल्याकडे ज्या profession ला सर्वात जास्त महत्त्व हवं त्याला आणि त्या professionals ना काहीच किंमत नाही आहे. काहीच नाही ना जमत तर मास्तर हो. त्यामुळं आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे. केवळ परिक्षार्थी शिक्षणपद्धती झाली आहे, केवळ marks डोळ्यापुढे ठेवून शिकलं जातं किंवा तो शिक्षणाचा हेतू मानला जातो. त्यासाठी आम्ही काही समविचारी मंडळींनी ही संस्था स्थापन केली आहे. Quality Education Support Trust नावाची. सोनाळे नावाचा जो आदिवासी भाग आहे ठाण्याजवळ वाडा तालुक्यात, तिथे आम्ही दहा/बारा गावांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. तिथे आमचा base आहे. आधुनिक शिक्षण पद्धती आम्ही वापरतो, traditional पेक्षा. निलेश निंबकर म्हणून आमचे director आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं राबवतो. एक प्रकारचा बदल आम्ही करू शकतो का as far as quality of education is concerned असा आमचा प्रयत्न आहे.आणि तुमच्या ह्या उपक्रमाला बाहेरुन मदत शक्य आहे का, आणि ती कशी करता येइल?


अर्थात अंतर खूप असेल तर donations हा एकच मार्ग राहतो. तो एक सोपा मार्ग आहे. मदत तर हवी असतेच. आत्ता आमची अडचण अशी आहे की परदेशी असलेल्या लोकांना जर मदत करायची असेल तर परदेशातून direct मदत नाही स्विकारता येत त्या currency मध्ये. कारण आमचा अजून FCRA, Home ministry ची एक permission लागते जी काही वर्षांनंतरच मिळते. ती एक मोठी process आहे पण indian currency मध्ये जर काही मिळाले तर जरूर स्विकारू शकतो.Help Quest!

2 comments:

Abhijit Dharmadhikari said...

अप्रतिम मुलाखत घेतली आहेस, प्रशांत!
अनेक धन्यवाद!

Prashant Khapane said...

thanks abhijit. Hows everything at your end?

Share it !!